
सावंतवाडी : ऊन पावसाची तमा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकीकडून थंड पेय व बिस्किट वाटप करण्यात आली. गणेश चतुर्थी निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापन तसेच प्रत्येक सणांना नागरिक,वाहनधारक व व्यापाऱ्यांना सोयीचे ठरतात. त्यांची ऊन पावसामध्ये होणारी धावपळ पाहता सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांच्याकडून थंड पेय
व बिस्किट देण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, सुजय सावंत व संजय पेडणेकर यांनी ही सेवा दिली. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक पद्धतीचे आभार मानलेत. गेले दोन दिवस कमी मनुष्यबळामुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड तणाव आहे. पुढील अकरा दिवस धकाधकीचे असताना सामाजिक बांधिलकीच्या या प्रेमाने पोलीस यंत्रणेला अधिक स्फूर्ती मिळाली आहे.