वेंगुर्ल्यात दीपक केसरकर यांच्या तर्फे शिवसेनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप

Edited by: दिपेश परब
Published on: June 30, 2023 16:40 PM
views 215  views

वेंगुर्ले : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या माध्यमातून आज (३० जून) शहरातील भाजीविक्रेते तसेच इतर किरकोळ वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. येथील पवनपुत्र भाजी मंडई येथे छत्री वाटपाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेनेचे संतोष परब, दाभोली ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.