देवगड तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कारांचं वितरण..!

Edited by:
Published on: February 20, 2024 15:07 PM
views 208  views

देवगड : देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे 2024 चे आदर्श दर्पण पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरी विभाग श्रीकृष्ण रानडे व साईनाथ गांवकर तर ग्रामीण विभागासाठी शंकर मुणगेकर व राजेंद्र साटम यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आले. तसेच पोंभुर्ले येथे आदयपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकामध्ये देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने जांभेकरांची जयंती मोठया उत्साहात साजरी. 

देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर सभागृहामध्ये जांभेकरांच्या जयंती निमित्त देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणा-या 2024 च्या आदर्श दर्पन पत्रकारीता पुरस्कार प्रदान सोहळयाच्या कार्यक्रमाच्यावेळी सल्लागार संपादक प्रुडंट मिडीया, गोवा चे किशोर नाईकगावकर, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, माजी माहिती जनसंपर्क अधिकारी सतिश लळीत, देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, जेष्ठ पत्रकार माधव कदम, लोकमतचे आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज सोनवलकर, सहाय्यक संपादक निलेश करंदिकर, प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, सुधाकर जांभेकर,राजेंद्र मुंबरकर,दयानंद मांगले,प्रशांत वाडेकर,संतोष कुळकर्णी,अनिल राणे,महेश तेली,सचिन लळीत,सुरज कोयंडे,संतोष साळसकर आदी बहुसंख्य पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना किशोर नाईकगावकर म्हणाले की, समाजामध्ये परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीकोनातून आपली निर्भिड पत्रकारीता असली पाहिजे, दर्पनकारांची पत्रकारीता आज कित्येक वर्षानंतरही तेजस्वीपणे झळकत आहे. याचा आदर्श मराठी वृत्तपत्रकार सृष्टीने नव्हे तर अनेक भाषिक वृत्तपत्रिकांमध्ये घेतला जात आहे. देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने अतिशय चांगले उपक्रम राबविले जात आहेत. ते खरे बाळशास्त्री जांभेकरांचे वारसदार असून संपुर्ण राज्यामध्ये या समितीचा आदर्श घेतला जाईल असेही काम हि समिती करीत असल्याचे मत किशोर नाईकगावकर यांनी व्यक्त केले.

यावेळी र्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा पत्रकार संघाचे उमेश तोरस्कर,सतिश लळीत,संतोष वायंगणकर,माधव कदम यांनी आपले विचार मांडले. यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन 2024 चा आदर्श दर्पन शहरी विभागाचा पुरस्कार श्रीकृष्ण रानडे व साईनाथ गावकर यांना प्रदान करण्यात आला तर आदर्श दर्पन ग्रामीण विभागाचा पुरस्कार शंकर मुणगेकर,राजेंद्र साटम यांना प्रदान करण्यात आला. तसेच विशेष सेवाभावी संस्था पुरस्कार सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष कुळकर्णी प्रास्ताविक अयोध्याप्रसाद गावकर तर आभार प्रशांत वाडेकर यांनी मानले.