कोलगाव सोसायटीमार्फत कोलगावात 'आनंद शिधा' वाटप !

जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांची प्रमुख उपस्थिती
Edited by:
Published on: October 26, 2022 11:17 AM
views 236  views

सावंतवाडी : कोलगाव विकास संस्थेमार्फत कोलगावात शासनाच्या 'आनंद शिधा' वाटप कार्यक्रम आज करण्यात आला. भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना सरकार आल्यानंतर गोरगरीब जनतेला अवघ्या शंभर रुपयात हा शिधा वाटप कार्यक्रम पूर्ण राज्यभरात सुरू आहे. आज कोलगाव गावामध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ झाला जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आला. यावेळी चेअरमन वीरेंद्र धुरी, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, माजी चेअरमन चंदन धुरी, प्रभाकर राऊळ, बळवंत कुडतळकर, बाबुराव चव्हाण, राजा चव्हाण, जयानंद मापसेकर, रवींद्र राऊळ, पुंडलिक राऊळ, संदीप हळदणकर, सुरेश दळवी, लक्ष्मण राऊळ, सलमा बेगम, यांसह शेकडो लाभार्थी उपस्थित होते. आनंदाचा शिध्याचा कोलगाव गावातील एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.