घोणसरीत शेतकऱ्यांना शेती साहित्य वाटप..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 08, 2023 18:17 PM
views 141  views

कणकवली : तालुक्यातील घोणसरी येथे ग्रामपंचायत घोणसरी मार्फत 15 वा वित्त आयोग अंतर्गत गावातील शेतकऱ्याना शेती उपयोगी साहित्य म्हणून विळे वाटप करण्यात आले. भात पीक कापणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी विळे वाटप केल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन घोणसरी सरपंच श्री. मॅक्सी पिंटो यांनी केल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

सदर कार्यक्रमाच्या वेळी सरपंच श्री.मॅक्सी पिंटो, उपसरपंच सौ.दीप्ती कारेकर ग्रामपंचायत सदस्य सौ आचरेकर, श्री.सचिन सुतार,आरोग्य मित्र श्री मिलिंद मराठे ,ग्रामसेवक श्री सिद्धेश गोसावी,कृषी सहायक सौ. हूले ,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.