
देवगड : जिल्हा परिषद सिंधुदूर्ग आयोजित क्रिडा स्पधेत देवगड तालुक्याने दमदार कामगिरी करत सर्वांची वाहव्वा मिळवली. देवगडचा संघ गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव व गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला. देवगडच्या संघाने प्रत्येक खेळात भाग घेत स्पर्धा गाजवली यावेळी देवगड तालुका क्रिक्रेट पुरुष गटात उप विजेता ठरला तर कबड्डी, लंगडी, रस्सीखेच पुरुष गटात उपविजेता ठरला. तर महिला गटात क्रिकेट संघ उप विजेता ठरला. वैयक्तिक स्पधेत दिव्यांग मधुन बुद्धीबळ स्पधेत कुंदा बोंडाळे प्रथम क्रमांक , कॅरम सिंगल द्वितीय क्रमांक कुंदा बोंडाळे , भाला फेक ,गोळा फेक व थाळी फेक प्रथम क्रमांक अश्विनी सावंत यांनी पटकावला . पुरुष गटात थाळी फेक प्रथम क्रमांक प्रमोद कामतेकर तर गोळा फेक तृतीय क्रमांक विनायक धुरी तर थाळी फेक द्वितीय क्रमांक विनायक धुरी यांनी पटकावला.
१०० मिटर धावणे पुरुष गटात प्रथम क्रमांक सुनिल कोदले यांनी पटकावला ८०० मिटर धावणे पुरुष गटात गुंडू निऊंगरे यांनी पटकावला .थाळी फेक पुरुष प्रथम क्रमांक आदित्य कदम यांनी पटकावला . भालाफेक पुरुष तृतीय क्रमांक शितल देवरकर याने पटकावला . २०० मीटर धावणे महिला प्रथम क्रमांक आर्या धुरी हिने पटकावला ४०० मीटर धावणे महिला गटात तृतीय क्रमांक सीमा आंधळे यांनी पटकावला . उंच उडी महिला तृतीय क्रमांक शितल दुदवडकर हिने पटकावला . थाळी फेक महिला प्रथम क्रमांक कोमल राऊत हिने पटकावला , गोळा फेक महिला तृतीय क्रमांक कृपाली घाडी हिने पटकावला . तर भाला फेक महिला द्वितीय क्रमांक शितल मयेकर हिने पटकावला.
या जिल्हा परीषद क्रिडा स्पधेत प्रत्येक संघातील संघनायकांनी महत्वाची भुमिका बजावली . यामध्ये पुरूष गटात क्रिकेट संघनायक सुनिल कोदले , खो खो लहु दहीफळे , कबड्डी आनंद जाधव , रस्सीखेच आदीत्य कदम , लंगडी मधुसूदन घोडे यांनी काम पाहिल . तर महिला गटात महिला क्रिकेट संघनायक कोमल राऊत , रस्सीखेच संगिता भुजबळ , कबड्डी स्वप्नजा बिर्जे , खोखो मेधा राणे , लंगडी शितल मयेकर यांनी काम पाहिल .
या स्पधेत प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गटविकास अधिकारी श्रीम .वृक्षाली यादव , सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक कुणाल मांजरेकर , अधिक्षक मेधा राणे , विस्तार अधिकारी ग्रा.प अंकुश जंगले , आनंद जाधव , सचिन जाधव , मधुसुदन घोडे , संतोष राणे , प्रकाश वाडकर ,नविन जाधव यांनी काम पाहिल. विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आल .