
कणकवली : वृद्धांचा सन्मान आणि त्यांचे आपल्या आयुष्यासाठीचे योगदान याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी जि.प पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.1मध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सर्व ज्येष्ठांचे स्वागत औक्षण करून केले.तसेच त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आजी - आजोबांना वंदन करून त्यांना गोड खाऊ भरवला. विद्यार्थ्यांमध्ये एकत्रित कुटुंबाचे महत्त्व रुजवण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक प्रभा आखीवटे आणि संदीप कदम यांनी केले. या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम स्तुत्य आहे