गोयची दिशा ठरली पहिली क्रॅश फायर टेंडर चालवणारी भारतीय महिला फायरफायटर

Edited by:
Published on: November 28, 2023 18:30 PM
views 90  views

पणजी : आज महिला सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत.  अशीच अग्निशमन बंबावर पाण्याची पाईप हाताळणारी पहिली प्रमाणित भारतीय महिला बनली आहे दिशा नाईक. दिशा क्रॅश फायर टेंडर ऑपरेट करणारी भारतातील पहिली प्रमाणित महिला अग्निशामक बनली आहे. एअरपोर्ट रेस्क्यू अँड फायरफायटिंग क्षेत्रातील या कामगिरीबद्दल तिचे कौतुक होत आहे.

दिशा सध्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळच्या एअरोड्रोम रेस्क्यू अँड फायर फायटिंग युनिटमध्ये कार्यरत आहे. दिशाने नोव्हेंबर 2021 मध्ये मनोहर विमानतळ येथे बचाव आणि अग्निशमन विभागात पदासाठी अर्ज केला होता. त्यानंतर अथक समर्पणामुळे तिला सर्व पूर्वतयारी पूर्ण करता आली. आणि आता ती अधिकृतरित्या या विभागात रुजू झाली आहे.

तिने विमान बचाव आणि अग्निशमनासाठी डिझाइन केलेले क्रॅश फायर टेंडर चालवण्यात स्वारस्य दाखवले होते. त्यानंतर तिने नमक्कल, तामिळनाडू येथे सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. तिला आता  गोव्याची पहिली प्रमाणित महिला अग्निशामक म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.