
सावंतवाडी : नैसर्गिक सुंदरता लाभलेल्या आजगाव गावात बाहेरील अज्ञात व्यक्तीं टाकाऊ वस्तू, प्लास्टिक, कचरा रस्त्याच्या बाजूला टाकून विद्रुपता निर्माण करत आहेत. याबाबत ग्रामपंचायत स्तरावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सरपंच यशश्री सौदागर यांनी सांगितलं.
आजगाव वाघबीळ रस्त्याच्या दरम्यान गटारात, रस्त्यावर प्लास्टिक पिशव्य, टाकाऊ वस्तू, कचरा टाकण्यात येतो. बरेच दिवस झालेत तरी या रस्त्यावरून येताना जाताना हा कचरा निदर्शनास पडत आहे. दिवसेंदिवस ह्या टाकाऊ कचऱ्याचे प्रमाण वाढतच आहे. येथे बरेच शेतकरी असून त्यांची गुरे ढोरे येथून जात येत असतात. मात्र हा टाकलेला कचरा, वस्तू, प्लास्टिक खाल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो त्याचं प्रमाणे येणारे जाणारे पादचारी, वाहन चालकांना याचा त्रास होत असून, दुर्गंधी पसरत असून हा कचरा वाऱ्याने रस्त्यावर विखुरलेला दिसतो. त्यामुळे कचऱ्याची समस्या मोठी झाली आहे.
मात्र आजगाव सारख्या सुंदर गावात बाहेरील अज्ञात व्यक्तीकडून हे कृत्य करण्यात येत असून याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत ग्रामपंचायत स्तरावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सरपंच यशश्री सौदागर यांनी सांगितलं.