
कोल्हापूर : सावंतवाडी तालुक्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या गाव समित्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आहेत. या सर्व गाव समितीच्या नेमणुकीवेळी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत व समिती नेमणूक करणे सुद्धा कठीण झालेले आहेत. आज या संदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अमोल येडगे यांची भेट घेऊन सावंतवाडी देवस्थान समिती समोर येणाऱ्या अडचणींबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
आमची बाजू ऐकून घेऊन योग्य तो प्रकारचा मार्ग काढू असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. देवस्थान कमिटीच्या उपसमित्या स्थापन करताना येणाऱ्या अडचणी, उपसमिती सदस्यांसाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी, देवालयांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी कडून मिळणारी तुटपुंजी मदत, याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली, सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन देवस्थान कमिटीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या अटी लवकरात लवकर शिथील करून तोडगा काढू असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
याप्रसंगी सिताराम गावडे, ज्ञानेश्वर परब, राजन राऊळ, पंढरीनाथ राऊळ, दिनेश गावडे उपस्थित होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आमदार राजन तेली यांनी केले.