संजय भोगटेंच्या 'त्या' बॅनरची चर्चा !

काय आहे बॅनर ?
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 13, 2023 13:29 PM
views 1438  views

कुडाळ : माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी कुडाळ बस स्थानकासमोर लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा कुडाळमध्ये रंगली आहे.

संजय भोगटे यांनी लावलेल्या बॅनरवर खासदार आमदार या पैकी एकाही नेत्याचा फोटो नसून फक्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हात उंचावलेला फोटो पहायला मिळत आहे. त्यामुळे संजय भोगटे उबाठा शिवसेना गटात नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. तर संजय भोगटे हे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्ती असल्याने पुन्हा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगत आहे.