
वैभववाडी : दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुलभतेने मिळावा यासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये UDID (Unique Disability ID Card) नसलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर केली जाणार आहे.
जिल्हा पातळीवर कार्ड काढणे शारीरिक व आर्थिकदृष्ट्या कठीण ठरत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर दिव्यांगासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.शिबिरादरम्यान सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची पात्रता व अपात्रता तपासणीसह आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांनी केले आहे.










