
देवगड : देवगड येथील शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित कौशल्य शिक्षण कार्यक्रमांतर्गत शासनमान्य.विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत अग्रगण्य विद्यापीठा कडून आरोग्य क्षेत्र तसेच व्यावसायिक अभ्यास क्रमामध्ये या चालू वर्ष २०२४ मध्ये डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी व बीएससी इन डायलिसिस टेक्नॉलॉजी या दोन अभ्यासक्रमांचा समावेश येथील ठिकाणी सुरू करण्यात आला आहे.
तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सटिस्त या मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या हे कोर्स असून यामध्ये तज्ञ मार्गदर्शक लाभणार आहेत तसेच डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी हा एक वर्षाचा प्रोग्राम असून बीएससी इन डायलेसिस टेक्नॉलॉजी हा तीन वर्षाचा कोर्स आहे. या दोन्ही कोर्स करता शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स अथवा समकक्ष अशी आहे. प्रतिवर्षी ४० विद्यार्थ्यांची एक तुकडी किमान २० विद्यार्थी प्राप्त झाल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे.तसेच यापुढील काळात अन्य प्यारमेडिकल कोर्सेस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्था अध्यक्ष डॉ.के.एन.बोरफळकर यांनी यावेळी दिली. यावेळी देवगड एज्युकेशन बोर्ड स्थानीय समिती सचिव ऍड अविनाश माणगावकर, खजिनदार दत्ता जोशी ,सदस्य चंद्रकांत शिंगाडे, डॉ. पुष्कर आपटे आदी उपस्थित होते.