दोडामार्ग दीपावली शो टाईमच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्पृहा दळवी प्रथम

अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलं खास कौतुक
Edited by: संदीप देसाई
Published on: November 30, 2023 20:19 PM
views 72  views

दोडामार्ग : दोडामार्ग दीपावली शो टाईम मध्ये आयोजित खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्पृहा सुमित दळवी हिने शिवाजी महाराजांची भारदास्त व्यक्तिरेखा साकारत प्रथम क्रमांक पटकावला. स्पृहा चा हा परफॉर्म पाहून राजा शिव छत्रपती फ्रेम अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खास कौतुक केलं आहे.

  दोडामार्ग येथील वक्रतुंड मित्र मंडळ बाजारपेठ दोडामार्ग यांनी आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत गोवा महाराष्ट्र मधून 17 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत एकसे एक व्यक्तिरेखा साकारत रसिकांची मने जिंकली. यात दक्ष मळीक ने साकारलेला राखणदार, नितीन बांदेकर ने साकारले संभाजी महाराज, श्रेयांश किनळेकर याने साकारलेला दोडामार्ग नगरपंचायतचे स्वच्छतादुत सफाई कामगार, राम बांदेकरने साकारले शिवाजी महाराज, स्वरा मळीकने साकारलेला मावळा,  संस्कार गावकरने साकारलेलं शंभू राजे आणि स्थानिक कलाकार म्हणून नाव्या गवस यांनी रसिकांवर भुरळ घालत बक्षिसे पटकाविलीत. 

  या स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योजक विवेकानंद नाईक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस,  बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई, उद्योजक दत्ताराम बाबा टोपले, सुनील गवस, वक्रतुंड मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, उपाध्यक्ष प्रकाश सावंत, विशाल मणेरीकर, रंगनाथ गवस, परीक्षक दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.