
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांची सावंतवाडीच्या माजी नगरसेविका दिपाली सावंत आणि समाजिक कार्यकर्ते दत्ताराम सावंत यांनी सदीच्छा भेट घेतली. सावंतवाडीचे शिवसेना संपर्क प्रमुख असणाऱ्या रविंद्र फाटक यांच्यासोबत संघटना बांधणीसह सावंतवाडीच्या विकासाबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी शहरविकासाला लागेल ती मदत देण्याचा शब्द आम. रविंद्र फाटक यांनी दिला.