शहरात महायुतीचा झंझावाती प्रचार

मंत्री दीपक केसरकर 'ऑन फि्ड' सावंतवाडी देणार सर्वाधिक लीड : मंत्री केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 07:05 AM
views 267  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रासप पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शहरात झंझावाती प्रचार केला. स्वतः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 'ऑन फिल्ड' उतरत शहरातील व्यापारी वर्गाची भेट घेतली. यावेळी नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन मंत्री केसरकर यांनी केल. 

सावंतवाडी शहरातील व्यापारी वर्गाची भेट शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेत राणेंना विजयी करण्यासाठी आवाहन केलं. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचारात सहभागी झाले होते. भर उन्हात झंझावाती प्रचार केसरकरांकडून करण्यात आला. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी मतदारसंघ हा नारायण राणेंना सर्वाधिक लीड देणारा मतदारसंघ ठरेल असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सुधन्वन आरेकर, संजय पेडणेकर,शर्वरी धारगळकर, भारती मोरे, किर्ती बोंद्रे, परिक्षीत मांजरेकर, प्रतिक बांदेकर, बंटी पुरोहित, देव्या सुर्याजी, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, संदीप निवळे, वर्धन पोकळे, अर्चित पोकळे, सुरज मठकर, माधुरी वाडकर, नंदू शिरोडकर, प्रथमेश कुडतरकर, सुनील नाईक, महेश सुकी, शुभांगी सुकी, दत्ता सावंत, सुकन्या टोपले, देवेन पडते, क्षीप्रा सावंत आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.