
सावंतवाडी : दिनेशचंद्र आत्माराम सावंत भोसले वय ८६ रा.माजगाव सावंतवाडी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, ३ विवाहित मुली, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर त्याच्या माजगाव डगराई येथील जुन्या घराजवळील त्यांच्या जमिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा एकत्र असताना त्यांनी कृषी विभागात सेवा बजावली होती. १९९६ साली ते कृषी अधिक्षक म्हणून निवृत्त झाले. कृषी विभागात असताना त्यानी बीड, दापोली, गुहागर या भागातही सेवा बजावली होती.त्यापूर्वी त्यानी शिक्षक म्हणून आंबोली येथे काम केले होते. उत्तम गायक म्हणून रत्नागिरी आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले होते. भजनी कलाकार म्हणून त्यांची या जिल्ह्यात ओळख होती.
आयुर्वेद महाविद्यालयाचे कर्मचारी श्रीराम सावंत भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील विजयकुमार सावंत भोसले यांचे ते वडील होत. तर जिल्हा न्यायालय कर्मचारी भगवान सावंत यांचे ते सासरे होत. त्यांच्या निधनामुळे समस्त माजगाव येथील सावंत भोसले परिवारात शोककळा पसरली आहे.