नेरूर इथं आषाढी एकादशी निमित्त दिंडी...!

Edited by: भरत केसरकर
Published on: June 28, 2023 15:32 PM
views 172  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल नेरूर आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीमध्ये संत रखुमाई, संत गोरा कुंभार, संत तुकाराम, विठ्ठल रखुमाई, वारकरी इत्यादी भूमिका विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये साकारल्या. शाळेसमोर गोल रिंगण करून टाळांच्या जयघोषात विठू नामाचा गजर करण्यात आला. यावेळी  मुख्याध्यापक सौरभ पाटकर, वेदिका परब, नीलम मेस्त्री, श्रद्धा गोसावी, चैतन्या चव्हाण, कीर्ती भोगटे शालिनी चव्हाण आदी शिक्षक वर्ग, विद्यार्थी व बहुसंख्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांनी सादर केलेल्या या दिंडीचे नेरूर गावातून कौतुक होत आहे. मुलांनी केलेल्या या  कार्याबद्दल जणू काही इंग्लिश मीडियम स्कूल ला पंढरपुराचे रूपदर्शन आले होते.