
सावंतवाडी : श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा कुडाळ येथे रविवार ०८ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. हि सभा जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी परीट जातीबांधव उपस्थित होते. उपस्थित जातीवांधवानी नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. या सभेत कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून नवीन कार्यकारणी खालीलप्रमाणे आहे.
यात दिलीप भालेकर, सावंतवाडी अध्यक्ष, किरण चव्हाण, मालवण उपाध्यक्ष, विलास साळसकर, देवगड उपाध्यक्ष,प्रसाद पाटकर, वेंगुर्ला उपाध्यक्ष, नागेश कुडाळकर, कुडाळ उपाध्यक्ष, तातू कडू, वैभववाडी उपाध्यक्ष, धनश्री चव्हाण, कणकवली उपाध्यक्ष, अनिल शिवडावकर, कुडाळ सचिव, गुरुनाथ मडवळ, वेंगुर्ला
सहसचिव, संदिप बांदेकर, सावंतवाडी खजिनदार, अशोक आरोलकर, वेंगुर्ला सहखजिनदार तसेच संजय होडावडेकर, सावंतवाडी, रितेश चव्हाण, सावंतवाडी, संदिप कडू, वैभववाडी, विनायक चव्हाण, मालवण, किरण कुणकेश्वरकर, देवगड, गणेश शिवडावकर, कणकवली, राजेंद्र भालेकर, सावंतवाडी, पदसिद्ध सदस्य महेंद्र आरोलकर, वेंगुर्ला, मोहन वालकर, मालवण, सदानंद अणावकर, कुडाळ, विजय पाटील, देवगड, शेखर कडू, वैभववाडी, भालचंद्र करंजेकर, कणकवली, श्रीकृष्ण परीट, दोडामार्ग यांची निवड करण्यात आली.