सत्काराने भारावले दिगंबर नाईक

Edited by: विनायक गावस
Published on: March 14, 2024 13:31 PM
views 139  views

सावंतवाडी : माझं बालपण माझ्या आजोळी मामाच्या गावीच झालं. त्यामुळे या आजोळी गावची ओढ काही औरच आणि माझ्या आजोळी गावच्या मातीत पंचक्रोशीत जो सत्कार झाला तो खरोखरच माझ्या दृष्टीने भाग्याचा आहे अशा शब्दात मालवणी अभिनेता दिगंबर नाईक यांनी कलंबिस्त येथे सत्कार कार्यक्रमात बोलताना भावना व्यक्त केल्या. कलंबिस्त हायस्कूलच्या मैदानावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व दीपक केसरकर मित्र मंडळाच्या सहकार्याने सांस्कृतिक नाटक ब्रँड अँब सेडर हे नाटक आयोजित करण्यात आले होते. यावेळी कलंबीस्त गावच्या वतीने व आमदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने श्री नाईक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व कलंबिस्त हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांच्या हस्ते श्री नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख नारायण राणे संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गजानन नाटेकर सरपंच सपना सावंत उपसरपंच सुरेश पास्तेसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत सचिव यशवंत बाबा राऊळ शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवन लाड विभाग प्रमुख विनायक सावंत संघटक उपविभाग प्रमुख संजय पालकर सरपंच मोहन राऊळ ग्रामपंचायत सदस्य व शाखाप्रमुख हनुमंत पास्ते एडवोकेट अमोल कविटकर कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुका अधक्ष अँड संतोष सावंत  मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे सहसचिव विनोद सावंत माजी जि प सदस्य पंढरी राऊळ शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव सांगली उपसरपंच संतोष नार्वेकर अंतोन रोड्रिक्स भाई सावंत  आदी उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री नाईक पुढे म्हणाले माझ्या मामाचं गाव म्हणजे माझा आजोळ सांगेली त्यामुळे या सह्याद्री पट्ट्यातील पंचक्रोशीत माझे बालपण गेले सांगेली कलंबिस्त या गावाबद्दल ओढ माझ्या मनात कायम घर करून आहे या भागात मी खूप काही शिकलो आहे आणि त्यामुळेच मी अभिनय क्षेत्रात मी वेगळी उंची गाठू शकलो आणि त्याच माझ्या आजोळी भागातील लोकांच्या समोर एवढा मोठा गौरव होत आहे तोच खरा माझा सन्मान आहे हा सन्मान मला लाख मोलाचा वाटतो माझ्या सत्कारासाठी या भागातील एवढी मंडळी व्यासपीठावर आहेत यावरूनच या पंचक्रोशीची एकजूट आणि एकी आणि येथील आध्यात्मिक वारसा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे तुमचे आजोळ वासियांचे प्रेमाने मी भारावून गेलो आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या आजोळच्या भागातील आठवणींना उजाळा दिला यावेळी केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे या सह्याद्री पट्ट्यातील गावावर विशेष प्रेम आहे आणि त्यामुळेच त्यांनी या भागातील लोकांना एक सांस्कृतिक चळवळ व्यापकपणे पुढे जावी यासाठी त्यांनी नाट्य रशकांसाठीही मेजवानी दिली आहे येथील या भागाच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन किशोर वालावलकर तर आभार एडवोकेट संतोष सावंत यांनी मानले ब्रँड अँबेसडर या नाटकात कोकणातील आणि विशेषता देवगड कणकवली सावंतवाडी या भागातील नाट्य कलाकारांची भरणे आहेत यामध्ये नयन जाधव संदेश तेली संदीप कांबळे अनिल शिंदे नितीन घाणेकर उमा शंकरपाटील श्रद्धा मोहिते या कलाकारांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.