
बांदा : बांदा सटमट वाडीतील दीपक पेंडसे यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत रात्री गवारेडा पडला. याबाबतची कल्पना वनविभागला दिली वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्ना नंतर ही अखेर गाव्यारेड्याचा विहिरीत गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर त्याला बाहेर काढू वनविभागच्या मार्फत त्याची विल्हेवात लावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती आशिकी बांदा सटमतट वाडी येथे गाव्या रेड्यांचा कळप गेले कित्तेक दिवस काजू बायायती मध्ये धुडगूस घालत होता. काजू बोडू खाऊन शेतकऱ्याचे नुकसान करत होते. सोमवारी रात्री दीपक पेंडसे यांच्या बागेतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी गावारेडा पडला. पेंडसे यांनी सकाळी पाण्याची मोटर चालू केली असता पाईप मधून गधूळ पाणी येऊ लागले. गढूळ पाणी कशा मुळे येथे हे पाहण्यासाठी पेंडसे विहिरी पाशी गेले. विहिरीत डोकाऊन पाहिले असता विहिरीत गवारेडा पडल्याचे त्यांना निदर्शनास आले. यावेळी त्यांनी बांदा व सावंतवाडी येथील वनविभागाला यांची कल्पना दिली.
सावंतवाडी वनपरीक्षेत्र सुहास पाटील हे जलद बचाव टीम घेऊन घटनास्थळी पोहचले. यावेळी गव्याला सखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दोरीच्या शहाय्याने बचाव कार्य सुरु केले. ही घटना गावात समजताच सर्वांनी गव्याला पाहण्यासाठी घटना स्थळी एकच गर्दी केली होती. रात्री पडलेल्या गव्याचा विहिरी बाहेर पडण्यासाठी मोठी धडपड सुरु होती. धडपडी मध्ये गवा जखमी ही झाला होता. शेवटी बाहेर पडण्याच्या नादात गव्याचा गदमरून मृत्यू झाला. शेवटी मृत गव्याला वनविभागाने स्थानिकांच्या सहकार्याने बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली. यावेळी सावंतवाडी वनपरीक्षेत्र सुहास पाटील, बांदा वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक सुयश पाटील, पवन टारपे, जलद बचाव टीमचे बबन रेडकर, शुभम कळसुळकर, आनंद राणे, पुंडलिक राऊळ, तुषार सावंत, ग्रामस्थ दशरथ परब, महेश शिरोडकर, दीपक पेंडसे, विष्णू वसकर, कौस्तुभ पेंडसे, देवानंद कळगुटकर, मच्छिंद्र गडकरी, अजित कळगुटकर, अभिषेक कळगुटकर, ज्ञानेश्वर म्हावळकर, गोविंद गडकरी,