
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शहरात झंझावाती प्रचार केला. माठेवाडा येथे त्यांची कॉर्नर बैठक पार पडली. यावेळी येथील रहीवाशांकडून त्यांना 'धनुष्यबाण' देत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
माठेवाडा येथील रहिवाशांकडून दीपक केसरकर यांना धनुष्यबाण देत विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. येथील कलाकार नंदन उपरकर याच्याकडून हा धनुष्यबाण बनविण्यात आला. श्री. केसरकर प्रचारासाठी आले असता त्यांना हे शिवधनुष्य भेट स्वरूपात देण्यात आले. मंत्री केसरकर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, माजी नगरसेवक राजू बेग, उत्कर्षा सासोलकर, बबलू मिशाळ, देव्या सुर्याजी, बाळा चोणकर, श्री. पोकळे, नंदू गावडे आदी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.