भारतीय बौद्ध महासभेतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 04, 2025 11:44 AM
views 102  views

कणकवली :  भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा भवन कणकवली येथे 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला एस. के. कदम 'यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती' या विषयावर प्रवचन केले. यावेळी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत कदम प्रमुख वक्ते  होते. 

कार्यक्रमाची सुरुवात धम्म ध्वजारोण वआदर्शांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचेऔचित्य साधून तालुका शाखा कणकवलीच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी यांना शाल, पुष्पगुच्छ , सन्मानपत्र देऊन  तर उत्कृष्ट गाव शाखा यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 कार्यक्रमाला माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, माजी अध्यक्ष विश्वनाथ कदम कणकवली तालुका अध्यक्ष भाई जाधव, सरचिटणीस सुभाष जाधव, कोषाध्यक्ष महेंद्र कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  जिल्हा उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस संजय  पेंडूरकर, आभार प्रदर्शन संस्कार सचिव विलास वळंजु यांनी केले. कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी  उपाध्यक्ष दिलीप कदम, भीमराव जाधव, शंकर कदम दीपक कांबळे आदींनी सहकार्य केले.