माजगाव म्हालटकरवाड्यातील धालोत्सव २३ जानेवारीपासून

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 12:52 PM
views 36  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माजगाव म्हालटकरवाड्यातील धालोत्सव मंगळवार २३ जानेवारी २०२४ रोजी सुरु करण्यात आला.

वाड्यातील सर्व पुरुष, महिलांनी मांडावरील जागा साफ करुन इतरही परिसर साफ केला. पहिल्या दिवशी बाड्‌यातील सर्व महिला, पुरुष, बालगोपाळ सर्व मंडळी महादेव उत्सव मूर्तीकडे एकत्र येवून रितीरिवाजाप्रमाणे मानपान करुन, समई, पलडी तसेच सर्व साहित्य घेवून सर्व मंडळी मांडावर जावून पाटावर पलडी ठेवून, रांगोळी घालतात, महिला फाट्या धरुन ओव्या व गीते गातात.

सात दिवस चालणा-या धालोत्सवाची शेवटची रात्र सोमवार २९ जानेवारी २०२४ रोजी असून मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत मांड शिपणे, ओट्या भरणे, नवस बोलणे व फेडणे आदी कार्यक्रम संपन्न होतात. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे म्हालटकरवाडावासियातर्फे आवाहन करण्यात आले आहे.