देवगडात शासकीय सीमोल्लंघन उत्साहात !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 25, 2023 18:01 PM
views 211  views

देवगड : देवगड ब्राम्हण मंदिर देवगड सडा या ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी शासकीय सीमोल्लंघन सोने लुटण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. देवगडचे नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, देवगड दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक सुशांत परब यांच्या हस्ते या सोहळ्याचे विधिवत पूजन, आरती झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम देवगड पंचक्रोशीतील मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

या सोहळ्यास नगरसेवक नितीन बांदेकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, पोलीस नाईक प्रवीण सावंत, ऍड कौस्तुभ मराठे, डॉ. प्रमोद आपटे, सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संजय ढोबळे प्रवीण नळेकर, सेवानिवृत्त बँक शाखाधिकारी भास्कर खाडीलकर, सुवास मालाडकर, सुनील राणे, गिरीश धोपटे, जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले, महेश खवळे, संजय बेलवलकर, हेमंत पिसे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेखर गोळवणकर, प्रमोद महाजन, नितीन आळवे, उदय केळुस्कर, ब्राम्हण देवालयाचे मानकरी प्रशांत कावले, श्री वारीक शितल पाटील आणि अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.