देवगड तहसिलदारांनी केलं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 04, 2024 15:08 PM
views 115  views

देवगड : देवगड तहसिलदार कार्यालय येथे भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या  निमित्ताने सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार तथा भाप्रसे अधिकारी विशाल खत्री यांनी करून सावित्रीबाई फुले यांनाअभिवादन केले.

यावेळी निवासी नायब तहसिलदार विवेक शेठ, महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, कार्यालयीन अधिकारी तथा कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते .