
देवगड : विजयदुर्ग येथील रामेश्वर घरीवाडी येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी मिलेश बांदकर यांची यावर्षीची पहिली सहा डझनावारी हापुस आंब्याची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना झाली.
हापुस आंब्याला जागतिक स्तरावर पोहचविणारे मिलेश बांदकर बंधूनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हापुस आंब्याची पहिली पेटी मुंबईला पाठविली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर काळात त्यांच्या आंबा कलम बागेत मोहर आला होता हा मोहोर त्यांनी मेहनत करून वाचवला. याकाळात पाऊस होऊन सुध्दा कोणतेही झाडाला छप्पर न करता त्यांनी आलेला आंबा मोहोर वाचवला. त्यांच्या आंबा बागेत चार पेट्या आंबा अजून असून पुढील आठवड्यातच हा आंबा मुंबई वाशी येथे रवाना होणार असल्याचे मिलेश बांदकर यांनी सांगितले.










