स्वातंत्र्यदिनी देवगड येथे दोघांचे उपोषण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 16, 2023 11:30 AM
views 91  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत व पुरवठा विभाग यांच्याविरुद्ध देवगड तहसील कार्यालयासमोर बसून दोघानी उपोषण सुरू केले आहे. या मधील प्रशांत खवळेकर हे देवगड-जामसंडे च्या नगरपंचायत गैरकारभाराविरोधात उपोषनाला बसले आहेत.तसेच विजयदुर्ग येथील गणेश कीर हे पुरवठा विभागाच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत. 

देवगड-जामसंडे नगरपंचायतीने खाजगी जागेतील सांडपाण्याशी आमचा काही संबंध नाही असे उत्तर दिल्याने प्रशांत खवणेकर हे उपोषनास बसले आहेत.प्रशांत खवणेकर हे सडा भागात राहत असून शेजाऱ्याने आपले सर्व सांडपाणी गडग्याला भोक पाडून येण्या जाण्याच्या वाटेवर सोडले आहे. या संदर्भात प्रशांत खवणेकर यांनी वारंवार पाठपुरावा करून व निवेदन देऊन याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.याउलट हे सांडपाणी खाजगी जागेतील असल्याने आपण बंदोबस्त करू शकत नाही असे उत्तर त्यांनी दिले आहे.

यावर प्रशांत खवळेकर यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.आपली आई वृद्ध असून तिला रेशन दुकानावर रेशन घेण्यासाठी येता येत नाही.यामुळे तिचा मुलगा म्हणून तिला माझ्या अंगठ्यावर तिचे रेशन मिळावे यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून पुरवठा विभाग दाद देत नसल्याने पुरवठा विभागाच्या गैरकारभाराविरोधात विजयदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश कीर यांनी उपोषण सुरू केले आहे.उपोषणकर्त्यांची नायब तहसीलदार श्री.कृष्ण ठाकूर यांनी भेट घेतली आहे.मात्र इतर कोणीही अद्याप उपोषणकर्त्यांकडे फिरकलेले नाहीत.