
सावंतवाडी : शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ६ चे उमेदवार, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर जोर दिला. यावेळी महिला उमेदवार सौ. शर्वरी धारगळकर या देखील उपस्थित होत्या.
श्री. सुर्याजी यांनी 'डोअर टू डोअर' जात शिवसेनेचा प्रचार केला. जनतेतून चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सौ. समता सुर्याजी, सत्यवान बांदेकर, गणेश कुडव, श्री. तारी, मेहर पडते, संकल्प धारगळकर, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, सौ. बांदेकर, श्रद्धा सावंत, सौ. शिरवलकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










