देवरुख ST आगाराला नवीन बसेस मिळणार ?

आमदार शेखर निकम यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Edited by: मनोज पवार
Published on: January 29, 2025 15:45 PM
views 96  views

चिपळूण : चिपळूण व देवरुख येथील राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सध्या कोलमडलेली आहे. याला एकमेव कारण म्हणजे या दोन्ही आगारात असणाऱ्या बसेसची अपुरी संख्या! ज्या बसेस आहेत त्या दुरुस्तीसाठी कार्यशाळेत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. 

अडचणी लक्षात घेऊन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार  शेखर निकम यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या दोन्ही आगारांना नवीन बसेस तातडीने देण्याची निवेदनाद्वारे आग्रही मागणी केली. 

परिवहन मंत्र्यांनी या मागणी ला सकारात्मक प्रतिसाद दिला असून श्री सरनाईक यांनी सदर मागणीवर तातडीने माहिती घेऊन कार्यवाही करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.