हुर्शी गडदेवाडीतील देवळेकर यांचा गोठा कोसळला

Edited by:
Published on: May 25, 2025 11:55 AM
views 71  views

देवगड : देवगड तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, आज ठिकठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर घर,पडवी झाड अथवा माड पडून हानी झाली आहे.तालुक्यातील हुर्शी गडदेवाडी, येथील आपदग्रस्त सहदेव बाबाजी देवळेकर यांचा गोठा २२ मे च्या रात्री १०.१५ च्या सुमारास अतिवृष्टीत कोसळून गोठ्याचे अंशत: रु. ४०,०००/- हजार एवढे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासन मार्फत पंचयादी करण्यात आली असून, देवगड मध्ये ३२७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.