देवगडचे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुयश..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 29, 2024 14:05 PM
views 107  views

देवगड : एचपीसीएल हॉल कणकवली कॉलेज येथे सबज्युनीयर जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजीत करण्यात आल्या होत्या. यामध्ये उमा मिलिंद पवार हायस्कुल इंग्लिश मिडीयमच्या देवगड येथील विद्यार्थांनी यश मिळवले. स्पर्धेमध्ये शिवरत्न मार्शल आर्टस अकादमीचे मुख्य मुख्य प्रशिक्षक सचिन टेंबवलकर यांचे विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ मार्गदर्शन लाभले. तसेच यश प्राप्त केलेल्या खेळाडूंमध्ये जान्हवी कातवणकर (सुवर्णपदक), सुमन मानगावकर (सुर्वर्ण पदक), प्रथा पटेल (सुवर्णपदक) मितेश वाळके (रौप्यपदक), अंश पटेल (रौप्यपदक) यांचा समावेश आहे. तसेच देवगड इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सीपल क्रीडाशिक्षक, सर्वशिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.