
देवगड : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शेठ म. ग. हायस्कूल, देवगड या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. हे विज्ञान प्रदर्शन एन. एस. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनातील विविध स्पधांमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. प्राथमिक गटामध्ये वक्तृत्व स्पर्धेत श्रीमा मुकुल प्रभूदेसाई या इयत्ता सातवीमधील विद्यार्थिनीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. निबंध स्पर्धेमध्ये सुयश सुदेश गोलतकर या इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
माध्यमिक गटामध्ये अथर्व भरत पराडकर व जयेश पांडुरंग डगरे या नववी मधील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रतिकृतीसाठी प्रथम क्रमांक प्राप्त झाला तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्नेहा महादेव नागरगोजे या नववीमधील विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याप्रमाणेच निबंध स्पर्धेमध्ये इयत्ता दहावी मधील कुमारी दीक्षा विवेक मिस्त्रीहीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये
इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी प्राजक्ता केदार भिडे आणि राज्ञी विवेक कुळकर्णी त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान विषय शिक्षकांचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर आणि संस्था पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.










