युवा महोत्सवात देवगड महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 14, 2025 19:49 PM
views 33  views

देवगड :  शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित स. ह. केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात नेत्रदीपक यश संपादन केले आहे. सांघीक कला प्रकारामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल नृत्य हे लोकनृत्य सादर करून प्रथम पारितोषिक पटकाविले तर गौर गीत हे लोकगीत सादर करून तृतीय पारितोषिक मिळवत चमकदार कामगिरी केली आहे. क्रीडा व युवक संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित जिल्हा क्रिडा युवा महोत्सव २०२५ मध्ये  वैयक्तिक काव्य लेखन या कला प्रकारामध्ये कु. शिवमणी पाळेकर याने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले.या तिन्ही कला प्रकारात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची तसेच परीक्षकांनी मान्यवरांची मने जिंकली. लोकनृत्य आणि लोकगीत सादर करणारे विद्यार्थी साहिल जाधव, विनीत चव्हाण, शिवमणी पाळेकर, प्रफुल हजारे, योगीराज नार्वेकर, साहिल जाधव, तनिष नाईक, अभिषेक शिंदे, साईनील धुरे, पार्थ नाईकधुरे, या सर्व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले   तसेच महाविद्यालयातर्फे त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले.