
देवगड : दर शनिवारी तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर दर्शन देवगड आगार तर्फे यात्रा सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व देवगड आगार, यांच्या विद्यमाने देवगड हून कोल्हापूर, तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर दर्शन यात्रा दर शनिवारी आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेत देवगड तुळजापूर अक्कलकोट दर्शन मुक्काम पंढरपूर देवगड असा प्रवास होणार आहे. प्रवास भाडे प्रौढांसाठी १९०७ रुपये, तर मुले / महिला / ज्येष्ठ नागरिकांसाठी ९६१ रुपये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास पूर्णतः मोफत असेल. (जेवण व निवासाचा खर्च स्वतंत्र.)
दर शनिवारी स.,७ वा. देवगड येथून ही प्रवासी फेरी निघेल व अक्कलकोट येथे मुक्कामी जाईल व दुसरे दिवशी सकाळी निघणार आहे.यात्रेसाठी ४० प्रवासी उपलब्ध झाल्यानंतर बससेवा आपल्याला उपलब्ध होणार आहे तसेच ग्रुप बुकिंग सुविधा ही उपलब्ध आहे.अधिक माहिती व बूकिंगसाठी संपर्क आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप ९८६०४५००४३ स्थानकप्रमुख श्रीकांत सैतावडेकर, ८४११०३७०१४ सहा वाहतूक निरीक्षक बंड्या डोंगरे ७९७२३१९९४४ रोहिदास दळवी ९६६५५२५१८८,वाहतुक नियंत्रक एस बी नाईकधुरे ९४२०७४ २९८४ पी आर कामत, ९४२१२६३८५२,साई ओटवकर९७६७७४४४५४,धाकू तांबे ९९२३२७००२० , यांच्याशी संपर्क साधावा.










