
देवगड : देवगड बसस्थानकात असलेल्या प्रसाधनगृहाची दुरुस्ती झाली परंतु या बसस्थानकात असलेल्या प्रसाधनगृहातील आवश्यक ते ड्रेनेज अजूनही सुस्थितीत न झाल्याने व ते फुटून दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने त्या मार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना दुर्गंधी युक्त पाण्याचा तसेच त्या मार्गावरील दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. देवगड आगारातील एसटी कामगार संघटना प्रतिनिधींनी देखील या समस्येकडे आगार व्यवस्थापकांचे लक्ष वेधले आहे. प्रवासी वर्गातून या वाहत्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.












