देवगडमध्ये महसूल सेवकांचे तहसीलदारांना निवेदन

Edited by:
Published on: September 22, 2025 20:20 PM
views 421  views

देवगड :  राज्यातील महसूल सेवकांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. अनेकदा पाठपुरावा करून मांगणी मान्य न झाल्याने  १२ सप्टेंबरपासून नागपूर येथील संविधान चौकात महसूल सेवकांचे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील महसूल सेवक २२ सप्टेंबरपासून नागपूर येथील धरणे आंदोलनात सहभागी होत असल्याबाबत देवगड तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन सादर करताना महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष संजय रूपे, उपाध्यक्ष गौरव चव्हाण यांच्यासह संदीप मीठबावकर, महेश बिर्जे, मालती डोंबाळे, प्रितेश डोंगरे, सुभाष तिर्लोटकर, प्रवीण वाडेकर, जगन्नाथ केंद्रे, विनय कोयंडे, सुचिता गोईम, दिलीप साटम, दीपेश सांगळे, प्रवीण जंगले, संतोष महाडिक, हर्षला राणे, मिलिंद राणे, चंद्रकांत पुजारी, राजेंद्र ताम्हणकर, मनोज राठोड, प्रणित सावंत, विवेक भोगटे, लक्ष्मण घाडी, प्रशांत मीठबावकर आदी महसूल सेवक उपस्थित होते.