
देवगड : कणकवली तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलीसांची कारवाई होते. परंतु देवगडमध्ये कारवाई होताना दिसत नाही असा आरोप मनसे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांनी केला. कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. कणकवलीत पोलिसांकडून मटका धाड प्रकरणानंतर कणकवलीतील ६३ बुकींना नोटीसा पाठवून जुगार न खेळण्याचे हमीपत्र लिहून घेतले अशीच कारवाई देवगड तालुक्यात होणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं.
मटका घेणारे आता पावती न देता आनलाईन मटका घेत आहेत. तसेच अवैधरित्या गोवा बनावटीची दारू सर्रासपणे विकली जात आहे, यावर पोलीसांची कारवाई कधी होणार असा सवालही त्यानी केलाय.