
देवगड : देवगड तालुक्यातील मोंड येथील शांताराम विष्णू कुळकर्णी माध्यमिक विद्या मंदिर येथील विद्यार्थिनी आनिया इम्रान नवाब हिने शिषवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ८ तील शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्या बद्दल आनिया इम्रान नवाब हिचे सिंधुदुर्ग पतपेढीचे अध्यक्ष सुरेंद्र लांबोरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन तिचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्यध्यापिका आसावरी सुनिल कदम यांनी त्यांचे आभार मानले.