
देवगड : हिंदळे ग्रामपंचायत हिंदळे ग्रामस्थ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदळे भंडारवाडा ग्रंथालय येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदानास आलेल्या एकूण २७ पैकी २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हिंदळे ग्रामस्थांकडून दरवर्षी किमान १ ते २ रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्धार केला आहे.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व रक्तदान चळवळीचे आयोजक म्हणून दयानंद तेली यांना देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठाण शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हिंदळे सरपंच मकरंद शिंदे ,माजी सभापती सुनीलभाई पारकर, दयानंद तेली, मनोज जाधव, ग्रा. पं. सदस्य ॲड. दिप्ती खोत, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आचरेकर, सदस्य विजयकुमार जोशी, प्रकाश जाधव, दिक्षा तेली, प्रसाद ढोके, निलेश पारकर, महेश शिरोडकर, अनुप बापट, उद्धव गोरे, संजय खोत, योगेश बांदल आदींसह रक्तदाते उपस्थित होते.