
देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा पोलीस अधिक्षक मोहन दहीकर व उद्योजक संजय आंग्रे यांच्या हस्ते संपन्न झाली. तसेच श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त येणाऱ्या भाविकांकरीता सुलभ दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात देखील आले आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजां संपन्न होत असते. दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ दुसऱ्या सोमवारी पहिल्या पूजेचा मान मोहन दहीकर, जिल्हापोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व संजय आंग्रे उद्योजक फोंडा यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते विधिवत प्रथम पूजा झाल्यानंतर सकाळी ०६:०० वाजता दर्शन रांगा चालु करण्यात आल्या. या निमित्ताने जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व उद्योजक संजय आंग्रे यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.