
देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्थ नियोजन करण्यात आली असल्याची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या कडून देण्यात आली आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव प्रति वर्षाप्रमाणे संपन्न होतअसून दुसरा श्रावणी सोमवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी या श्रावणी सोमवारी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी सुयोग्य असे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त व पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजां संपन्न होत असते दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ दुसऱ्या सोमवारी पहिल्या पूजेचा मान मोहन दहीकरजिल्हापोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व संजय आंग्रे उद्योजक फोंडा यांना देण्यात आला आहे.प्रत्येक सोमवारी प्रथम पुजा झाल्यानंतर सकाळी सुमारे ०६:०० वाजता दर्शन रांगा चालु करण्यात येतील याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी प्रतिवर्षाप्रमाणे रा.प.म. देवगड आगर यांच्या वतीने श्रावणी सोमवार निमित्त स्पेशल देवगड कुणकेश्वर जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरामध्ये सकाळी ०६ : ०० ते रात्रौ ०८:०० या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित भजनी मंडळांचे कार्यक्रम सादर होणार आहेत येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसुविधा व दर्शन व्यवस्था नियोजन ट्रस्ट वतीने करण्यात आले आहे.
तसेच दिनांक १० ऑगस्ट २००२५ वार रविवार रोजी श्री देव कुणकेश्वर देवस्थानचे दादरा वार्षिक होणार असून सदर वार्षिकावेळी दुपारी ०२:०० वा ते रात्रौ ०८:०० वाजेपर्यंत कुणकेश्वर मंदिर परिसर भाविकांसाठी बंद राहतील यात कुणकेश्वर मारुती मंदिर तिठा ते कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर महापुरुष पार (बाजारपेठ) ते कुणकेश्वर मंदिर, मिठमुंबरी बीच ते कुणकेश्वर मंदिर पर्यंतचे सर्व मार्ग या कालावधीत बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच दिनांक ११ ऑगस्ट २०२५ वार सोमवार सायंकाळी ०४:०० ते सायंकाळी ०५:०० या कालावधीमध्ये भावई वार्षिक होणार असल्याने मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद राहील.याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घेऊन देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या कडून करण्यात आले आहे.