
देवगड : देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रत्येक श्रावणी सोमवारी ला विविध मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजां संपन्न होत असते दिनांक २८ जुलै २०२५ पहिल्या सोमवारी पहिल्या पूजेचा मान सुरेश नेरुरकर – प्रसिद्ध उद्योजक मालवण आणि आनंद शिरवलकर ---– प्रसिद्ध उधोजक कुडाळ यांना देण्यात आला होता. प्रथम पुजा झाल्यानंतर सकाळी सुमारे ०६:०० वाजता दर्शन रांगा चालु करण्यात आली व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला,यावेळी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव प्रति वर्षाप्रमाणे संपन्न होत असून दिनांक २८ जुलै २०२५ व दिनांक ०४ ऑगस्ट ११ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२५ या चारही श्रावणी सोमवारी येणाऱ्या भाविक भक्ताकारीता सुलभ दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त व पार्किंग व्यवस्था देखील चोख करण्यात आली होती.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रा.प.म. देवगड आगार यांच्या वतीने श्रावणी सोमवार निमित्त स्पेशल देवगड कुणकेश्वर तसेच रत्नागिरी सावंतवाडी कणकवली येथून जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या भाविकांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी ही सोय करण्यात आली होती.यावेळी मंदिरामध्ये सकाळी ०६:०० ते रात्रौ ०८:०० या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित भजनी मंडळांचे कार्यक्रम सादर करण्यात आले.
येणाऱ्या भाविक भक्तांना सोयीसुविधा तसेच दर्शन व्यवस्थे बाबत सुयोग्य असे नियोजन ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले होते. सर्व भाविक,भक्त, पर्यटक यांनी देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि प्रशासकीय यंत्रणेस यावेळी उत्तम सहकार्य केले.
दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव प्रति वर्षाप्रमाणे संपन्न होणार असून दिनांक २८ जुलै २०२५ व दिनांक ०४ ऑगस्ट ११ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२५ या चारही श्रावणी सोमवारी येणाऱ्या भाविक भक्ताकारीता सुलभ दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजां संपन्न होणार आहे.
दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेलेश्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्साहात साजरे करण्यात आला यावर्षीही भाविकांची श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी केली होती श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांनी भाविकांच्या सोयीसाठी दर्शन मंडप तसेच दर्शन रांगांची व्यवस्था केलेले पाहायला मिळाले.भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन श्रींचे दर्शन घेता आले.मात्र अभिषेक व तत्सम धार्मिक विधी सोमवारी गाभाऱ्याच्या बाहेरच करण्यात आले.यावेळी श्रावणी सोमवार निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री देव कुणकेश्वराची पहाटे ५ वा. प्रथम पूजा केली गेली व त्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी रांगेतून दर्शन घेण्याचा लाभ घेतला. दरवर्षी श्रावण सोमवारी कुणकेश्वर येथे होणारी वाढती गर्दी पाहता श्री क्षेत्रकुणकेश्वरला मिनी जत्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे.