रीड अँड शाईन प्री - प्रायमरी स्कूल

देवगड मधील पहिली मान्यता प्राप्त शाळा
Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 28, 2025 19:29 PM
views 39  views

देवगड : देवगड मधील पहिली मान्यता प्राप्त शाळा रीड अँड शाईन प्री-प्रायमरी स्कूल देवगड जामसंडे येथील रीड अँड शाईन प्री-प्रायमरी स्कूल यांना Pre Primary School Accreditation Council of India, मुंबई यांच्याकडून गुणवत्ता मानांकन (Accreditation) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, सुरक्षितता, मूल्यमापन पद्धती, शिक्षक प्रशिक्षण, आणि पालक संवाद यामधील उत्कृष्टतेच्या मूल्यांकनानंतर ही मान्यता देण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. या वेळी या सोहळ्यानिमित्त सौ. प्रार्थना ढेकणे (महिला सल्लागार, देवगड) यांच्या हस्ते शाळेचे संस्थापक श्री. आशुतोष सप्रे व सौ. मधुरा सप्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. परीमळा गोडवे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास अंबर ज्ञानसंवर्धन संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनी पाटणकर उपस्थित होत्या. तसेच सर्व आजी - माजी विद्यार्थी व त्यांचे पालक आणि हितचिंतक उपस्थित होते.