
देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मागांधी विद्यामंदिर तळेबाजार. येथे' दीप अमावस्या' विविध उपक्रमांनीउत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वानुमते प्रशालेचे ग्रंथपाल श्रीमती सारंग मॅडम यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सारंग मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी पणत्या लावून सभागृह प्रकाशमान केले.दीप पूजनाने श्रावण मासच्या आगमनाची तयारी केली जाते.तसेच वर्षभरामध्ये देवपूजा ,आरती,शुभकार्य याप्रसंगी दिवे लावले जातात त्या दिव्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवशीदिप पूजा केली जाते असे विचार प्रशालेचे सहाय्यक शिक्षक तेली सर यांनी आपल्या भाषणातून मांडले. त्याचप्रमाणे आषाढ महिन्यात शेतकरी शेतामध्ये कष्टाची काम करतात या दिवशी दीप पूजनाने कष्ट संपल्याचे समाधान व्यक्त करुन श्रावण मासचे स्वागत करतात.असे विचार प्रशालेचे सहाय्यक शिक्षक कदम सर यांनी आपल्या भाषणातून मांडले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके सर यांनी आपले विचार मांडताना सांगितले आजची ही दीपपूजा आपल्या मनातील अंधकार दूर करण्यासाठी, नैराश्य दूर करण्यासाठी, वाईट विचाराचा नाश करण्यासाठी व सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी महत्त्वाची आहे.अस मत प्रशालेचे मुख्याध्यापक वाळके सर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.चनबसुगोळ मॅडम यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन जोईल सर यांनी केले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके सर,सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.