
देवगड : पंचायत समिती देवगडचे नियोजन विभाग व ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी अंकुश जंगले यांची पंचायत समिती सावंतवाडी येथे बदली झाली आहे .
पंचायत समिती देवगड मध्ये विस्तार अधिकारी (सां) म्हणून अंकुश जंगले यांनी १० वर्षे काम केल असुन या दहा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या प्रभावी विकासात्मक कामांमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली होती.
खास करून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी म्हणून काम करताना खऱ्या अर्थाने वेगळी ओळख म्हणजेच कार्यतत्पर दबंग विस्तार अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली कारण ग्रामपंचायत विस्तार अधिकारी म्हणजेच काटेरी मुकुट त्यात सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वयक साधत प्रत्येक गावात विकासात्मक कामे व्हावीत तसेच गावांतील तक्रारी या सुनावण्या घेऊन समजस्यांने सोडवण्यात अंकुश जंगले पारंगत असून यात त्यांचा फार मोठा वाटा होतो . म्हणुच देवगड तालुक्यातील पदाधिकारी, सरपंच संघटना व ग्रामस्थ त्यांच्या कामांचे नेहमीच कौतुक करत असत .
विस्तार अधिकारी अंकुश जंगले यांची सावंतवाडीत बदली झाल्याने देवगडच्या प्रशासनात नक्कीच उणीव जाणवेल. यात तीळ मात्र शंका नाही यावेळी पंचायत समिती देवगडच्या वतीने गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव , सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी संतोष बिर्जे व अधिकारी, कर्मचारी वर्गाने केलेल्या कामाचा गौरव निरोप समारंभावेळी केला .