ब्रह्मदेव मंदिरात २७ मार्चला महारुद्र जपाभिषेक

Edited by:
Published on: March 24, 2025 20:16 PM
views 166  views

देवगड : देवगड तालुक्यातील कोर्ले येथे असलेल्या श्री ब्रम्हदेव मंदिरात २७ मार्च रोजी श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्ले आणि वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड आणि कोर्ले ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ' या धार्मिक विधीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञामध्ये २०० ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे,अशी माहिती श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्लेचे अध्यक्ष सुधीर रानडे यांनी दिली. भाविकांनी महाप्रसादाचा लाभघेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

या दिवशी दुपारी ३ ते ६:३० या वेळेत महारुद्र जपाभिषेक होईल. सायंकाळी ६:३० ते ७ दरम्यान महाआरती आणि मंत्रपुष्पाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ७ ते ७:३० या वेळेत मान्यवरांचे मनोगत त्यानंतर सायंकाळी ७:३० ते रात्री ९ दरम्यान महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धर्माचरण, संस्कृती आणि परंपरांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

ब्रह्मदेवाचा महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोर्ले येथील ब्रम्हदेव मंदिर हे सर्वात शेतकऱ्याने गावातील ग्रामस्थांना ही प्राचीन आणि महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. कोलें सारख्या दुर्गम भागात हे मंदिर असून याची आख्यायिका देखील आहे. एकेकाळी एक शेतकरी कोर्ले गावातील या डोंगरभागात शेत नांगरत असताना नांगराच्या फाळाला रक्त लागल्यासारखे दिसले. त्याला वाटले ठिकाणी बैलांच्या पायाला फाळ लागून रक्त आल असावं. म्हणून त्याने शेतीचे काम तिथेच थांबवून तो शेतकरी बैलांना घेऊन घरी गेला. घरी जाऊन बैलांचे पाय चेक केले. त्याला कुठेही जखम दिसली नाही, मग तिथे रक्त कसे आले? या विचाराने तो झोपी गेला. यावेळी त्याला साक्षात्कार झाला. "तू जिथे नांगरतोस तिथे माझ ठिकाण आहे. अहं ब्रम्ह." असा साक्षात्कार झाल्यानंतर त्या गोष्ट सांगितली. गावातील लोक त्या शेतकऱ्यासोबत त्या ठिकाणी गेलेलं असता एक गाय दुधाचा पान्हा त्या जागेवर सोडत अस्थाना दिसली. त्यानंतर ती गाय ग्रामस्थांना गावात कधीच दिसली नाही. गाय ज्या ठिकाणी पान्हा सोडत होती त्या असलेल्या पाषाणाला ग्रामस्थांनी गवताची घुमटी करून पूजाअर्चा सुरु झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी देवाचा कौल प्रसाद घेत सुधारणा केली. या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनोकामना पूर्ण होतात. याची काही उदाहरणेही त्यांनी दिली. अशा या मंदिराची निवड महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ साठी केली आहे.

रानडे, बापट यांच्या मार्गदर्शनाखाली सोहोळ्याचे आयोजन या धार्मिक सोहळ्याचे आयोजन सुधीर रानडे (अध्यक्ष, श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्ले) आणि उदय भा. बापट (अध्यक्ष, वैदिक संवर्धन मंडळ, देवगड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. याशिवाय समस्त ग्रामस्थ मंडळी, कोर्ले व मुंबई यांचाही मोठा सहभाग आहे. भाविकांनी अधिक माहितीसाठी उदय बापट (९४२३८१८९५५) आणि श्री. सुधीर रानडे (८६००३२१०१५) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांन कडून करण्यात आले आहे.यावेळी वैदिक संवर्धन मंडळ, देवगडचे अध्यक्ष उदय भा. बापट, कोलें सरपंच व गावप्रमुख विश्वनाथ खानविलकर, श्री. लेले, पद्माकर रानडे. अभय रानडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.