जामसंडे हायस्कूल येथे ५ ऑक्टोबरला निबंध स्पर्धेचे आयोजन

दीक्षित फाउंडेशनचे आयोजन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 25, 2024 14:25 PM
views 275  views

देवगड : देवगड येथील दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून जामसंडे हायस्कूल येथे 5 ऑक्टोंबर रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांचे पिताश्री निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मृतिदिनानिमित्त दीक्षित फाउंडेशनच्या वतीने देवगड तालुक्यातील श्रीराम मोरेश्वर गोगटे या माध्यमिक हायस्कूल येथे ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० ते ११:३० यावेळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटात होणार आहे. वडील या विषयावर ही निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

लहान गटासाठी (२०० शब्दमर्यादा) माझे बाबा, बाबा म्हणजे सुखाची सर हे दोन विषय देण्यात आले आहेत.तर मोठ्या गटासाठी(३०० शब्दमर्यादा) जगातील सुरक्षित आभाळ म्हणजे वडील व माझे बाबा असे दोन विषय देण्यात आले . या स्पर्धेसाठी लहान गटांना प्रथम ५०० द्वितीय ३०० व तृतीय २०० तर मोठ्या गटांसाठी प्रथम ७०० द्वितीय ५०० तृतीय ३०० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक शाळेतील विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन दिक्षित फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, अध्यक्ष नारायण माने,सचिव माधव यादव यांनी केले आहे.