देवगड अर्बन बँकेच्या तज्ञ संचालक पदी ॲड. प्रणाली माने

Edited by:
Published on: July 09, 2023 19:32 PM
views 222  views

देवगड : नगरसेविका प्रणाली माने यांची अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर तज्ञ संचालक पदी निवड करण्यात

आली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव क्रमांक २५ ने तज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात

आली आहे. प्रणाली माने या विद्यमान नगरसेविका असून त्यांनी यापुर्वी नगराध्यक्षा, उपसभापती आदी महत्वाची पदे भुषविली आहेत. तज्ञ

संचालक म्हणून त्यांचा झालेल्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच कौतुक करण्यात येत आहे.