
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार चैताली सांवत, तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचेकडे देण्यात आला होता. आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार आर. जे. पवार, तहसिलदार देवगड यांचेकडे या कार्यालयाकडील पुढील आदेश होईपर्यत सुपूर्द करण्यात आला आहे.
आर.जे.पवार, तहसिलदार देवगड यांना जिल्हा खनिकर्म अधिकारी सिंधुदुर्ग या पदाकरीता आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आला असून, पवार यांनी आपले मुळ पदाचा कार्यभार सांभाळून वरील पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.